मार्गदर्शक सूचना

प्रकल्पपरिसर व पुस्तकांबद्दल सूचना

 • बालसाहित्य (हिलरेंज हायस्कूल) ते संतसाहित्य (श्रीजननी माता मंदिर) आणि बालसाहित्य (हिलरेंज हायस्कूल) ते विविध कलाविषयक साहित्य (श्री. गणपत पारठे यांचे घर), अशा सुमारे 02 किलोमीटरच्या परीघात हा प्रकल्प सामावलेला आहे.
 • गावातील कृषीकांचन या कृषीविषयक वस्तू विक्री केंद्राच्या वर (पहिल्या मजल्यावर), जिथे चरित्र-आत्मचरित्र पुस्तकांचं दालन आहे, तिथे शासनाचे प्रकल्प कार्यालय कार्यरत आहे.
 • पुस्तके वाचनासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत, तथापि, चहा, न्याहरी, भोजन व निवास ह्या व्यवस्था सशुल्क आहेत. त्यासाठीचे शुल्कही सोयीसुविधांनुसार ज्या-त्या घरमालकांनी ठरविले आहे. त्या शुल्काचा शासनाशी संबंध नाही.
 • प्रकल्पातील काही सहभागी घरांमध्ये आणि गावात इतरत्रही निवास व भोजनाची सशुल्क व्यवस्था उपलब्ध आहे. | निवास व्यवस्था
 • वाचक व पर्यटकांनी सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पुस्तक वाचनाचा आस्वाद घ्यावा.
 • पुस्तके हाताळताना व वाचताना वाचकांनी पुस्तकांची काळजी घेणे आवश्यक आहे.
 • पुस्तके वाचताना किंवा जागांना भेट देत असताना संबंधित घरांतील इतर साहित्याची हानी होणार नाही, घरातील सदस्यांस कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, तसेच सार्वजनिक मालमत्तेची कोणत्याही प्रकारे हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
 • पुस्तके संबंधित दालनातच किंवा दालनाच्या परिसरातच वाचावीत.
 • क्वचित प्रसंगी पुस्तके वाचण्यासाठी बाहेर न्यावयाची झाल्यास यथोचित नोंदी करून आणि ओळखपत्र अनामत म्हणून देऊन घरमालकाच्या परवानगीनेच न्यावीत.
 • प्रकल्पास पुस्तके भेट देण्यासाठी किंवा अन्य स्वरूपात सहकार्य करण्यासाठी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. (प्रकल्प कार्यालय पत्ता दुवा देणे)
 • प्रकल्पातील घरांमध्ये धुम्रपान व मद्यपान यांस सक्त मनाई आहे.

ठिकाणापासून भिलारचे अंतर (किमी)