उपक्रम / कार्यक्रम

शुक्रवार, ४ मे २०१८ | पुस्तकांचं गाव या प्रकल्पाचा वर्षपूर्ती सोहळा

भारतातील पहिल्या पुस्तकांचं गाव या प्रकल्पाचा 'एक वर्ष पूर्ण' होत आहे!
या निमित्ताने खुल्या प्रेक्षागृहाचा (अ‍ॅम्फी थिएटर) उद्घाटन सोहळा, नव्या ५ दालनांचा शुभारंभ, वर्षपूर्ती स्मरणिकेचे प्रकाशन, 'शब्दचांदणे' (सांस्कृतिक कार्यक्रम) हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत
दिनांक व वेळ: शुक्रवार, ४ मे सायं. ५.०० वा. | ठिकाण: खुले प्रेक्षागृह (अ‍ॅम्फी थिएटर) श्रीराम मंदिराजवळ.
कार्यक्रम पत्रिका

15 ऑक्टोबर | वाचन प्रेरणा दिन 2017 | भारतरत्न डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम जयंती

विविध क्षेत्रांतील व्यासंगी मान्यवरांशी व साहित्यिकांशी गप्पा मारण्याची संधी.. दुपारी 3 ते सायंकाळी 5.30 या वेळेत पुस्तकांच्या गावात ज्येष्ठ विचारवंत डॉ.सदानंद मोरे, भाषासंवर्धक श्याम जोशी, अभिनेते राहुल सोलापूरकर, योगेश सोमण, मिलिंद लेले, डॉ.संगीता बर्वे, किरण गुरव, रणधीर शिंदे..अशा अनेक दिग्गज साहित्यिकांसोबत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आणि वाचनपर्यटनाचा आनंद घेण्यासाठी... अवश्य या !

स्मरण विंदांचे - परिसंवाद - अभिवाचन - काव्यवाचन

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून पुस्तकांच्या गावात (भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) 'स्मरण विंदांचे' हा कार्यक्रम शनिवार दि. १६ सप्टेंबर २०१७ रोजी येणार आहे. परिसंवाद, कविसंमेलन, अभिवाचन असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत ४ सत्रांत हा कार्यक्रम संपन्न होईल. डॉ. अरुणा ढेरे, अभिराम भडकमकर, प्रदीप निफाडकर, ऐश्वर्य पाटेकर, डॉ. अविनाश सप्रे, श्रीधर नांदेडकर, सौरभ गोखले, संगीता बर्वे, प्रमिती नरके आदी मान्यवर साहित्यिक, कलाकार व अभ्यासक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच कविवर्य विंदा करंदीकरांच्या परिवारातील श्रीमती जयश्री काळे, आनंद करंदीकर आदी सदस्यही कार्यक्रमास उपस्थित रहातील.

'कवितेच गाणं होतांना'

अलवार भावनांना शब्दरूप लाभलेली कविता ही मनाचा ठाव घेतेच. मात्र, त्या कवितेला सुरांची साथ मिळाली तर तिचे सौंदर्य आणखी झळाळून येते. अशाच भावपूर्ण कवितांची एक मंत्रमुग्ध करणारी मैफील रंगणार आहे पुस्तकांचं गाव, भिलार येथे गायक व संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी यांच्या 'कवितेच गाणं होतांना' या वेबसिरीजच्या समारोपाच्या कार्यक्रमात. कवितेचं गाणे होतानाचा प्रवास, कवितेचा आशय या विषयावर गप्पा आणि कवितेतून गाण्यात रूपांतर झालेल्या गाण्याचे सादरीकरण, असा बहारदार कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक रसिक श्रोत्यांनी यावेळी अनुभवता येईल दि, २३ डिसेंबर २०१७ रोजी .