साहित्य प्रकार व ठिकाणे

कथा

जागेचा प्रकार: घरासह लॉज
घराचे / घरमालकाचे नाव: श्री. प्रवीण भिलारे
संपर्क: 9422608703 / 9403945446

थोडक्यात माहिती
- आबालवृद्धांना आकर्षित करेल असे, बालकथा, विज्ञानकथा, लोककथा, कौटुंबिक कथा, रहस्यकथा इत्यादी प्रकारांनी समृद्ध असलेले दालन.
सविस्तर वाचा

  • अतिशय लोकप्रिय वाङ्मय प्रकार.
  • जुन्या काळातील लेखकांपासून ते समकालीन लेखकांपर्यंतचे कथासंग्रह उपलब्ध. य.गो. जोशी, वि. स. खांडेकर, गंगाधर गाडगीळ, श्री.ना.पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, वि. वा. शिरवाडकर, शरदचंद्र मुक्तिबोध, रणजीत देसाई, दुर्गा भागवत, शं. ना. नवरे, अरविंद गोखले, व.पु.काळे, ज्योत्स्ना देवधर, प्रकाश नारायण संत, जयवंत दळवी, द. मा. मिरासदार, मंगला गोडबोले, गिरीजा कीर, अरुण साधू, उत्तम कांबळे, नागनाथ कोतापल्ले, राजन खान, सदानंद देशमुख, शरणकुमार लिंबाळे अशा मान्यवर लेखकांचे कथासंग्रह.
  • शहरी जीवन, ग्रामीण जीवन, वंचित घटकांचे जीवन यांचे चित्रण करणाऱ्या कथा.
  • श्री. म. माटे, बाबुराव बागुल, दया पवार, कमल देसाई, श्याम मनोहर, पु. शि. रेगे अशा वेगळ्या धाटणीच्या कथाकारांच्या कथा.
  • सुधा मूर्ती, आर. के. नारायण, यांचे अनुवादित कथासंग्रह.
  • शेरलॉक हॉम्स, ब्योमकेश बक्षी, फेलुदा, रस्किन बॉंड अशा जगप्रसिद्ध रहस्य कथांच्या मालिकांचा नजराणा.
  • नारायण धारप, रत्नाकर मतकरी यांच्या रहस्यमय आणि अद्भूत विश्वात घेऊन जाणाऱ्या कथा.
  • आबालवृद्धांना आकर्षित करेल असे, बालकथा, विज्ञानकथा, लोककथा, कौटुंबिक कथा, रहस्यकथा इत्यादी प्रकारांनी समृद्ध असलेले दालन.

कविता

जागेचा प्रकार: लॉज
घराचे / घरमालकाचे नाव: गिरीजा रिसॉर्ट
संपर्क: --

थोडक्यात माहिती
- केशवसूत, मर्ढेकर, माधव ज्युलियन यांच्यापासून आजच्या पिढीतील लोकप्रिय कवी सौमित्र, संदीप खरे, सौमित्र यांच्यापर्यंतच्या कविता.
सविस्तर वाचा

  • कविता म्हणजे सर्वांच्या अतिशय जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय.
  • केशवसूत, मर्ढेकर, माधव ज्युलियन यांच्यापासून आजच्या पिढीतील लोकप्रिय कवी सौमित्र, संदीप खरे, सौमित्र यांच्यापर्यंतच्या कविता.
  • निसर्गकवी बालकवी यांची कविता, बाकीबाब बोरकर यांचे कविता संग्रह व समग्र कवितेचे दोन खंड उपलब्ध.
  • मराठी भाषेच्या आणि साहित्याचा मुकुटातील शिरोमणी कविवर्य कुसुमाग्रज यांची समग्र कविता.
  • “देणाऱ्याने देत जावे”, म्हणणाऱ्या विंदा करंदीकर यांच्या कविता; तर ‘या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे’ म्हणत जीवनावर प्रेम करायला शिकविणारे मंगेश पाडगावकर यांचे कविता संग्रह.
  • स्त्री मनातील हळुवार भावनांना अलगदपणे साद घालणाऱ्या इंदिरा संत, पद्मा गोळे, शान्ता शेळके यांच्या कविता, तसेच आपल्या जीवन अनुभवांवर बेतलेल्या आणि मानवी जीवनाच्या थेट गाभ्याला भिडणाऱ्या बहिणाबाईंच्या कविता.
  • मानवी जीवनातील उदात्तता आणि उत्कटता यांचे दर्शन घडविणाऱ्या आरती प्रभूंच्या कविता तसेच चंद्रमाधवीच्या प्रदेशात घेऊन जाणारे कविवर्य ग्रेस यांचे कविता संग्रह.
  • ‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो! थोडासा गुन्हा घडणार आहे’, असे म्हणत वेगळ्याच “विद्यापीठाचे” दर्शन घडवणारे कवी नारायण सुर्वे; तर रानातल्या कविता गाणारे रानकवी ना. धों. महानोर यांचे कविता संग्रह.
  • गोलपीठा’कार नामदेव ढसाळ आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त जेजुरी काव्यसंग्रहासहित अरुण कोलटकर यांची समग्र कविता.
  • निसर्गरम्य परिसर आणि शांत वातावरणात कवितानुभव घेण्यासाठी सुसज्ज दालन!
  • मराठी भाषेत गझल हा काव्य प्रकार रुजवणारे सुरेश भट यांचे काव्य आणि गझल संग्रह.
  • वसंत आबाजी डहाके, कविता महाजन, प्रज्ञा दया पवार, रामदास फुटाणे, शरणकुमार लिंबाळे, इंद्रजीत भालेराव, दासू वैद्य इ. मान्यवर कवी/कवयित्रींचे काव्य संग्रह.
  • फादर थॉमस स्टीफन्स यांचे क्रिस्तपुराण व महाकवी होमरसकृत ग्रीक महाकाव्ये हे संग्रह उपलब्ध.
  • डॉ. नरेंद्र जाधव अनुवादित व संपादित भयशून्य चित्त जेथ हा रवीद्रनाथ टागोरांच्या प्रातिनिधिक कवितांचा संग्रह असलेले संपन्न असे दालन.

कादंबरी

जागेचा प्रकार: घर
घराचे / घरमालकाचे नाव: श्री. बाळासाहेब (प्रल्हाद) भिलारे
संपर्क: 9822013301 / 9422604467

थोडक्यात माहिती
- मराठी साहित्यातील अत्यंत वाचकप्रिय साहित्यप्रकार म्हणजे कादंबरी.
- वाचकाला, मराठी कादंबरीतील स्थित्यंतरांचा अनुभव देणारे दालन.
सविस्तर वाचा

  • मराठी साहित्यातील अत्यंत वाचकप्रिय साहित्यप्रकार म्हणजे कादंबरी.
  • मराठीतील लोकप्रिय कांदंबरीकार शिवाजी सावंत, रणजित देसाई, ना. सं. इनामदार, वि. स. खांडेकर, श्री. ना. पेंडसे, विश्वास पाटील, इ. लेखकांच्या कादंबऱ्यांनी समृद्ध असे दालन.
  • मराठी कादंबरीच्या प्रवाहाला एक वेगळं वळण बहाल करणारे कादंबरीकार भालचंद्र नेमाडे, चिं. त्र्यं. खानोलकर, गंगाधर गाडगीळ, पु. शि. रेगे, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर, किरण नगरकर, राजन खान, मिलिंद बोकील इ. लेखकांचे साहित्य.
  • सुप्रसिध्द कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या मराठीत अनुवादित कादंबऱ्या. तसेच अन्य भाषांमधील लोकप्रिय कादंबरीचे अनुवादही उपलब्ध.
  • स्त्री मनाचा मागोवा घेणाऱ्या सानिया, कविता महाजन, मेघना पेठे इ. लेखिकांच्या कादंबऱ्या.
  • बाबुराव बागुल, रा. रं. बोराडे, दया पवार, नामदेव कांबळे, भीमराव पांचाळ, लक्ष्मण माने, आनंद यादव, उद्धव शेळके, सदानंद देशमुख, इ. मान्यवर साहित्यिकांचे साहित्य वाचकांसाठी उपलब्ध.
  • वाचकाला, मराठी कादंबरीतील अनेक स्थित्यंतरांचा अनुभव देणारे दालन.

कादंबरी - दालन क्र. 2

जागेचा प्रकार: घर
घराचे / घरमालकाचे नाव: तानाजी दौलती भिलारे
संपर्क: 9764356537/8600055721

थोडक्यात माहिती
- मराठी साहित्यातील अत्यंत वाचकप्रिय साहित्यप्रकार म्हणजे कादंबरी.
- स्त्री मनाचा मागोवा घेणाऱ्या सानिया, कविता महाजन, मेघना पेठे इ. लेखिकांच्या कादंबऱ्या.
सविस्तर वाचा

  • मराठी साहित्यातील अत्यंत वाचकप्रिय साहित्यप्रकार म्हणजे कादंबरी.
  • मराठीतील लोकप्रिय कांदंबरीकार शिवाजी सावंत, रणजित देसाई, ना. सं. इनामदार, वि. स. खांडेकर, श्री. ना. पेंडसे, विश्वास पाटील, इ. लेखकांच्या कादंबऱ्यांनी समृद्ध असे दालन.
  • मराठी कादंबरीच्या प्रवाहाला एक वेगळं वळण बहाल करणारे कादंबरीकार भालचंद्र नेमाडे, चिं. त्र्यं. खानोलकर, गंगाधर गाडगीळ, पु. शि. रेगे, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर, किरण नगरकर, राजन खान, मिलिंद बोकील इ. लेखकांचे साहित्य.
  • सुप्रसिध्द कन्नड साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांच्या मराठीत अनुवादित कादंबऱ्या. तसेच अन्य भाषांमधील लोकप्रिय कादंबरीचे अनुवादही उपलब्ध.
  • स्त्री मनाचा मागोवा घेणाऱ्या सानिया, कविता महाजन, मेघना पेठे इ. लेखिकांच्या कादंबऱ्या.
  • बाबुराव बागुल, रा. रं. बोराडे, दया पवार, नामदेव कांबळे, भीमराव पांचाळ, लक्ष्मण माने, आनंद यादव, उद्धव शेळके, सदानंद देशमुख, इ. मान्यवर साहित्यिकांचे साहित्य वाचकांसाठी उपलब्ध.
  • वाचकाला, मराठी कादंबरीतील अनेक स्थित्यंतरांचा अनुभव देणारे दालन.

महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा व संस्कृती

जागेचा प्रकार: लॉज
घराचे नाव: अनमोल्स इन, श्री. राहूल राजेंद्र भिलारे
संपर्क: 9822338646

थोडक्यात माहिती
- महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा आणि संस्कृती यांची महती आणि माहिती विशद करणारे, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांची विस्तृत माहिती देणारे दालन.
सविस्तर वाचा

  • महाराष्ट्र प्रदेश, मराठी भाषा आणि संस्कृती यांची महती आणि माहिती विशद करणारे, मराठी भाषा, मराठी संस्कृती यांची विस्तृत माहिती देणारे दालन.
  • महाराष्ट्र शब्दकोश, संक्षिप्त मराठी शब्दकोश, संकल्पना कोश, वाक्संप्रदाय कोश, संज्ञा संकल्पना कोश, महाराष्ट्र संस्कृती कोश, महाराष्ट्र वाङमय कोश, महाराष्ट्रीय ज्ञानकोष, दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश, मराठी - इंग्रजी शब्दकोश, सुलभ हिंदी - मराठी कोश असे मराठी भाषेचे समृद्धी दर्शविणारे अनेक कोश उपलब्ध.
  • महाराष्ट्रीय बाण्याचा सार्थ अभिमान बाळगणारे अनेक साहित्यिक, विचारवंत, समाज-सुधारक यांची चरित्रे.
  • मराठी संस्कृती, महाराष्ट्रातील सण - उत्सव यांची ओळख करून देणारे ग्रंथ.
  • मराठीच्या इतिहासकारांना व संशोधकांना अतिशय उपयुक्त असणारं मुसलमानी रियासत ( 2 खंड ), मराठा रियासत ( 8 खंड ), ब्रिटीस रियासत (2 खंड) उपलब्ध.
  • भारतीय साहित्यशास्त्र, हाल सातवाहनाची गाथा सप्तशती, अरुण टिकेकर यांच्या अस्वस्थ महाराष्ट्र या ग्रंथाचे दोन खंड, भालचंद्र नेमाडेलिखीत टीका स्वयंवर, गणेश त्र्यंबक देशपांडेलिखित साहित्यशास्त्र, सुमन बेलवलकरलिखित लीळाचरित्रातील समाज दर्शन, माधुरी पुरंदरेलिखीत लिहावे नेटके, बखरवाङ्मय इ. मौलिक साहित्य उपलब्ध.
  • महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी संस्कृती यांच्या थेट गाभ्याला स्पर्श करणारे दालन.
  • “प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा!" याची प्रचिती आणून देणारं मरहाट्टी सुगंधाने भरलेलं समृद्ध दालन !
  • महाराष्ट्राने भारताच्या सर्वांगीण विकासात दिलेल्या भरीव योगदानाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पिाचय करून देणारे दालन!

विज्ञान

जागेचा प्रकार: लॉज
घराचे नाव: लॉज शिवसागर - श्री. सुभाष तुकाराम भिलारे
संपर्क: 9890050195

थोडक्यात माहिती
- अतिशय लोकप्रिय वाङ्मय प्रकार.
- जुन्या काळातील लेखकांपासून ते समकालीन लेखकांपर्यंतचे साहित्य उपलब्ध.
सविस्तर वाचा

  • सर्व वयोगटांच्या वाचक व पर्यटकांमधील जिज्ञासा आणि कुतूहल यांना चालना देणारे महत्त्वाचे दालन.
  • मूलभूत व उपयोजित विज्ञान आणि वैज्ञानिक यांची माहिती करून देणारं, विज्ञानातील रहस्य आणि गमती – जमती यांची मराठीत ओळख करून देणारं दालन.
  • विज्ञानातील निरनिराळ्या गूढ, क्लिष्ट संज्ञा सोप्या गोष्टीरूपात सांगणारी, ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांची पुस्तके.
  • मानवी शरीर, मनोविज्ञान, मानववंशशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जैवविविधता, खगोलशास्त्र इ. शाखांची माहिती करून देणारे दालन.
  • अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुखलिखित “जिनियस” ही जगातील थोर वैज्ञानिकांची माहिती करून देणाऱ्या पुस्तकांची मालिका.
  • अणुविज्ञान ते संगणक विज्ञान व माहिती तंत्रज्ञान, अशा विविध विषयांबाबतची पुस्तके.
  • आयझॅक अॅजिमॉव्हलिखित आणि सुजाता गोडबोले अनुवादित ‘शोधांच्या कथा’ या पुस्तकांची दीर्घ मालिका.
  • विविध क्षेत्रांत नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तींचा परिचय आणि त्यांच्या कार्याचा वेध घेणारी पुस्तके.
  • जयंत नारळीकर, बाळ फोंडके, निरंजन घाटे, अच्युत गोडबोले, अतुल कहाते, इ. लेखकांची विज्ञान व तंत्रज्ञान यांच्याशी मैत्री करून देणारी पुस्तके उपलब्ध.

ललित गद्य आणि वैचारिक

जागेचा प्रकार: लॉज
घराचे / घरमालकाचे नाव: श्री. सुहास काळे
संपर्क: 9422051726

थोडक्यात माहिती
- रवींद्रनाथ टागोर : समग्र साहित्यदर्शन’ हा डॉ. नरेन्द्र जाधव संपादित व अनुवादित ग्रंथ.
- विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची निबंधमाला दोन खंडात उपलब्ध सविस्तर वाचा

  • ज्येष्ठ संपादक, विचारवंत, आंतरराष्ट्रीय राजकारण, पाश्चात्त्य व पौर्वात्य विशेषतः महाराष्ट्रातील संस्कृती, समाज व इतिहास यांचा गाढा अभ्यास असलेले गोविंदराव तळवलकर यांची ग्रंथसंपदा.
  • राजे सयाजीराव गायकवाड यांच्या भाषणांचे पाच खंड उपलब्ध.
  • व्यासांचे शिल्प, जागर, शिवरात्र, रुपवेध इ. नरहर कुरूंदकर लिखित उत्तमोत्तम साहित्य, तसेच शेषराव मोरे यांच्या मुस्लीम मनाचा शोध आणि इतर साहित्य.
  • महेश एलकुंचवार यांच्या साहित्याचा आढावा घेणारे ग्रंथ तसेच पश्चिमात्य साहित्य आणि साहित्यकार यांची ओळख करून देणारे दालन.
  • ‘रवींद्रनाथ टागोर : समग्र साहित्यदर्शन’ हा डॉ. नरेन्द्र जाधव संपादित व अनुवादित ग्रंथ.
  • विंदा करंदीकर, ग्रेस, मंगेश पाडगावकर या मराठीतील सुप्रसिद्ध कवींचे मनोवेधक ललित लेखसंग्रह.
  • विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची निबंधमाला दोन खंडात उपलब्ध त्यासोबतच साने गुरुजी यांचेही संबंधित साहित्य उपलब्ध.
  • दुर्गा भागवत, शान्ता शेळके, शिरीष पै, कविता महाजन इ. स्त्री लेखिकांचे ललित लेख संग्रह उपलब्ध.
  • अच्युत गोडबाले यांचा पाश्चिमात्त्य साहित्यकांची ओळख करून देणारा ‘झपुर्झा’ हा ग्रंथ. तसेच सुप्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेठे यांचा ‘नाटकवाल्यांचे प्रयोग’ व लोकप्रिय संगीतकार सलील कुलकर्णी यांचा ‘लपवलेल्या काचा’ हे ललित लेख संग्रह उपलब्ध.
  • द. भि. कुलकर्णी, दिलीप पुरषोत्तम चित्रे, ग. वा. बेहरे, आनंद यादव, वसंत आबाजी डहाके, रामदास भटकळ, अनिल अवचट, अरुणा ढेरे, नंदा खरे, मिलिंद मालशे, उत्तम कांबळे, गिरीश कुबेर इ. मराठीतील मान्यवर लेखकांचे साहित्य उपलब्ध.

नाटक व चित्रपट

जागेचा प्रकार: घर
घराचे / घरमालकाचे नाव: शाम रामचंद्र भिलारे
संपर्क: 9422604775/8390404197

चित्रमय पुस्तके

जागेचा प्रकार: घर
घराचे / घरमालकाचे नाव: संपत गेणू भिलारे
संपर्क: 9421398070/9764706829

स्पर्धा परीक्षा

जागेचा प्रकार: घर
घराचे / घरमालकाचे नाव: अनिल नारायण भिलारे
संपर्क: 9421398070/9764706829

विनोदी

जागेचा प्रकार: घरासह लॉज
घराचे / घरमालकाचे नाव: श्री. संतोष गणपत सावंत
संपर्क: 9960082083

विविध लोकप्रिय व पुरस्कार विजेते

जागेचा प्रकार: लॉज
घराचे / घरमालकाचे नाव: जिव्हाळा, आकाश गणपत भिलारे
संपर्क: 9769935789

विविध कलांविषयक

जागेचा प्रकार: घर
घराचे / घरमालकाचे नाव: श्री. गणपत रामचंद्र पारठे
संपर्क: 9423033809 / 9405541804

संत साहित्य

जागेचा प्रकार: मंदिर
घराचे / घरमालकाचे नाव: श्री जननीमाता मंदिर
संपर्क:

साहित्यिक माहितीफलक (प्रदर्शनी)

जागेचा प्रकार: मंदिर
घराचे / घरमालकाचे नाव: श्री जननीमाता मंदिर परिसर (श्री गणपती मंदिराजवळ)
संपर्क:

लोकसाहित्य

जागेचा प्रकार: घरासह लॉज
घरमालकाचे नाव: श्री. नारायण वाडकर
संपर्क: 9324398529 / 7769988721

थोडक्यात माहिती
- लोकभाषा, लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोककला आणि लोकसंस्कृती यांचा परिचय घडवणारे दालन.
सविस्तर वाचा

  • लोकभाषा, लोकसाहित्य, लोकपरंपरा, लोककला आणि लोकसंस्कृती यांचा परिचय घडवणारे दालन.
  • लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समग्र वाङ्मय.
  • दुर्गा भागवतलिखित गुजरात, बंगाल, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा विविध प्रदेशांतील लोककथांची मालिका. तसेच सिद्धार्थ जातक या ग्रंथाचे सात खंड.
  • रा. चिं. ढेरेलिखित विठ्ठल एक महासमन्वय, लज्जागौरी, श्री महालक्ष्मी, श्री वेंकटेश्वर आणि श्री कालहस्तीश्वर, श्री तुळजा भवानी, नाथ संप्रदायाचा इतिहास इ. सुप्रसिद्ध ग्रंथ.
  • प्रा. रामनाथ चव्हाणलिखित भटक्या विमुक्तांची जातपंचायत या ग्रंथाचे विविध खंड.
  • विविध ठिकाणचे आदिवासी समाज, अहिराणी लोकसंस्कृती यांची ओळख करून देणारे अनेक ग्रंथ. तसेच, समाज जीवनाचे चित्रण करणारे गावगाडा, लोकरहाटी, लोकधाटी, लोकजीवन इ. ग्रंथ.
  • व्यंकटेश माडगूळकर, नारायण सुर्वे, आनंद यादव, अरुणा ढेरे, राजन गवस, बाबा भांड इ. लेखकांची पुस्तके.
  • लोकरंगभूमी, लोकनाट्य यांविषयीची आणि लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती यांच्याशी नाळ जोडणाऱ्या अनेक उत्तोमोत्तम ग्रंथांची मेजवानी.
  • समाजमनाचा आरसा म्हणून साहित्यक्षेत्रात मान्यता असणाऱ्या लोकसाहित्याचे समृद्ध दालन !

क्रीडा व विविध लोकप्रिय

जागेचा प्रकार: घर
घराचे नाव: साई, श्रीमती मंदा शाम भिलारे
संपर्क: 9028039880

थोडक्यात माहिती
- क्रीडाप्रेमींसाठी जणू शब्द क्रीडांगण
- क्रीडा आणि विविध लोकप्रिय साहित्याचा संगम.
सविस्तर वाचा

  • क्रीडाप्रेमींसाठी जणू शब्द क्रीडांगण
  • क्रीडा आणि विविध लोकप्रिय साहित्याचा संगम.
  • सचिन तेंडुलकर यांचे चरित्र व आत्मचरित्र तसेच विविध क्रीडापटूंचे चरित्रे उपलब्ध.
  • व्यायाम ज्ञानकोशाचे दहा खंड तर मंगेश पाडगावकर अनुवादित महाभारत दोन खंडात उपलब्ध.
  • लोकप्रिय साहित्यिक व. पु. काळे यांचे समग्र साहित्य.
  • बाबा कदम, सुहास शिरवळकर यांच्या साहित्याचा नजराणा.
  • साने गुरुजी, गो. नी. दांडेकर, रत्नाकर मतकरी, व्यंकटेश माडगूळकर यांची निवडक साहित्य संपदा.
  • भारतीय खेळांपासून आंतरराष्ट्रीय खेळांपर्यंत अनेक खेळांवरील पुस्तके.

निसर्ग, पर्यटन आणि पर्यावरण

जागेचा प्रकार: लॉज
घराचे नाव: मयूर रिसॉर्ट, श्री. अजय संजय मोरे
संपर्क: 7798000893 / 9420977962

थोडक्यात माहिती
- महाबळेश्वर – पाचगणी या दोहों मधील निसर्गसंपन्न अशा भिलार या गावात बसून निसर्ग व पर्यावरण विषयक पुस्तकांचा आस्वाद म्हणजे दुग्धशर्करा योगच.
सविस्तर वाचा

  • महाबळेश्वर – पाचगणी या दोहों मधील निसर्गसंपन्न अशा भिलार या गावात बसून निसर्ग व पर्यावरण विषयक पुस्तकांचा आस्वाद म्हणजे दुग्धशर्करा योगच.
  • प्रत्यक्ष निसर्गाच्या सान्निध्यातच निसर्गावरील वाचन करण्याची संधी देणारं निसर्ग साहित्याने समृद्ध असं वेगळं दालन !
  • निसर्ग व मानव या दोघांमधील नात्याचा साक्षात्कार घडवणारे दालन.
  • भारतातील जैवविविधतेची विस्तृत माहिती देऊन निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जाणारे दालन.
  • मार्को पोलो, मीना प्रभू, मिलिंद गुणाजी इत्यादींची प्रवास वर्णने उपलब्ध.
  • महाराष्ट्र शासनाचा विंदा पुरस्कारप्राप्त अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे समग्र साहित्य.
  • ‘वनोपनिषद’कार मारूती चितमपल्ली यांची पुस्तकं वन्यप्रेमींसाठी उपलब्ध.
  • सागरी जीवनाचे दर्शन घडविणारी तसेच नद्यांद्वारे संस्कृती समजावून सांगणारी ग्रंथमाला.
  • प्रकाश आमटेंच्या प्राणी प्रेमाला अर्पण असलेले विलास मनोहर लिखित ‘नेगल’ हे अविस्मरणीय पुस्तक दोन भागात उपलब्ध.
  • ऋतुचक्राचे विलोभनिय दर्शन घडविणारे दुर्गाबाई भागवत यांचे ‘ऋतुचक्र’ हे पुस्तक.
  • नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासारख्या अत्यंत महत्वाच्या विषयावर माहिती देणारे, महाराष्ट्र सरकारचे विविध प्रकारचे गॅझेटियर अभ्यासुंसाठी उपलब्ध असलेले, जंगल व वनसंपदा यांच्या संवर्धनासाठी प्रोत्साहन देणारे अतिशय मौलिक असे साहित्य दालन.

चरित्रे व आत्मचरित्रे, बोलकी पुस्तके व प्रकल्प कार्यालय

जागेचा प्रकार: घर
घराचे नाव: कृषिकांचन, श्री. शशिकांत भिलारे
संपर्क: 9420630236

थोडक्यात माहिती
- लेखक, उद्योजक, समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, क्रीडापटू, वैज्ञानिक, कलाकार इ. निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गजांची चरित्रे – आत्मचरित्रे उपलब्ध.
सविस्तर वाचा

  • मराठी साहित्यातील एक अतिशय महत्त्वाचा साहित्य प्रकार.
  • लेखक, उद्योजक, समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, क्रीडापटू, वैज्ञानिक, कलाकार इ. निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गजांची चरित्रे – आत्मचरित्रे उपलब्ध.
  • स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी इ. आदी थेर व्यक्त‍िमत्त्वांची चरित्रे – आत्मचरित्रे उपलब्ध.
  • पिकासो, व्हॅन गॉग, टॉलस्टॉय, एडिसन, ॲरिस्टॉटल, आइन्स्टाईन आल्फ्रेड नोबेल इ. पाश्चिमात्त्य प्रतिभावंत, विचारवंत, वैज्ञानिकांची चरित्रे.
  • सुनीता देशपांडे, सई परांजपे, विजया मेहता, श्रीराम लागू, नसरुद्दीन शाह, मोहन जोशी इत्यादी कलावंत ग्रंथ रूपाने वाचकांच्या भेटीला.
  • संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही दृष्टींनी समृद्ध दालन.
  • वाचकांसह लेखक आणि प्रकाशकही जया साहित्य प्रचाराला अधिक प्राधान्य देतात, अशा ग्रंथांचे दालन.
  • सर्व वयोगटांतील वाचकांना “आयुष्य कसं जगायचं?” आणि “कशासाठी जगायचं?” यांबाबत मार्गदर्शन करणारे आणि प्रेरणा देणारे ग्रंथ.

चरित्रे व आत्मचरित्रे - दालन क्र. 2

जागेचा प्रकार: घर
घरमालकाचे नाव: प्रकाश रामचंद्र भिलारे
संपर्क: 7028193287/9637648374

थोडक्यात माहिती
- लेखक, उद्योजक, समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, क्रीडापटू, वैज्ञानिक, कलाकार इ. निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गजांची चरित्रे – आत्मचरित्रे उपलब्ध.
सविस्तर वाचा

  • मराठी साहित्यातील एक अतिशय महत्त्वाचा साहित्य प्रकार.
  • लेखक, उद्योजक, समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, क्रीडापटू, वैज्ञानिक, कलाकार इ. निरनिराळ्या क्षेत्रातील दिग्गजांची चरित्रे – आत्मचरित्रे उपलब्ध.
  • स्वाम विवेकानंद, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी इ. आदी थेर व्यक्त‍िमत्त्वांची चरित्रे – आत्मचरित्रे उपलब्ध.
  • पिकासो, व्हॅन गॉग, टॉलस्टॉय, एडिसन, ॲरिस्टॉटल, आइन्स्टाईन आल्फ्रेड नोबेल इ. पाश्चिमात्त्य प्रतिभावंत, विचारवंत, वैज्ञानिकांची चरित्रे.
  • सुनीता देशपांडे, सई परांजपे, विजया मेहता, श्रीराम लागू, नसरुद्दीन शाह, मोहन जोशी इत्यादी कलावंत ग्रंथ रूपाने वाचकांच्या भेटीला.
  • संख्या आणि गुणवत्ता या दोन्ही दृष्टींनी समृद्ध दालन.
  • वाचकांसह लेखक आणि प्रकाशकही जया साहित्य प्रचाराला अधिक प्राधान्य देतात, अशा ग्रंथांचे दालन.
  • सर्व वयोगटांतील वाचकांना “आयुष्य कसं जगायचं?” आणि “कशासाठी जगायचं?” यांबाबत मार्गदर्शन करणारे आणि प्रेरणा देणारे ग्रंथ.

परिवर्तन चळवळ, समाजसुधारक व सुधारणांचा इतिहास

जागेचा प्रकार: घर
घरमालकाचे नाव: श्री. दत्तात्रय भिकू भिलारे
संपर्क: 9975866336

थोडक्यात माहिती
- भारतात घडलेल्या अनेक चळवळींपैकी एक अभूतपूर्व चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील परिवर्तन चळवळ. या चळवळीची माहिती देणारं सुसज्ज दालन.
सविस्तर वाचा

  • भारतात घडलेल्या अनेक चळवळींपैकी एक अभूतपूर्व चळवळ म्हणजे महाराष्ट्रातील परिवर्तन चळवळ. या चळवळीची प्रेरणादायी माहिती वाचकांपुढे सादर करणारं सुसज्ज असं दालन.
  • लोकहितवादींपासून ते संत गाडगेबाबांपर्यंतच्या समाजसुधारकांची परंपरा महाराष्ट्राने अनुभवली. या समाजसुधारकांची चरित्रे, विचार आणि कार्य यांबद्दलची पुस्तके या दालनात उपलब्ध.
  • अनेक थोर समाजसुधारक, समाजसेवक, समाजपरिवर्तक यांची चरित्रे आणि वाङ्मय उपलब्ध.
  • महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरलिखित समग्र मराठी वाङ्मय उपलब्ध.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर याच्या मूकनायक आणि बहिष्कृत भारत या वृत्तपत्रीय लेखांचा संकलित ग्रंथ तसेच, राजर्षी शाहू गौरव ग्रंथ वाचकांसाठी उपलब्ध.
  • क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन दर्शन घडविणारे ग्रंथ.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची छायाचित्रे, दस्तऐवज, विविध वृत्तपत्रीय लिखाण समाविष्ट असलेला दुर्मीळ असा ग्रंथ तसेच, भारताचे संविधानही उपलब्ध.
  • गोपाळ गणेश आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, र. धों. कर्वे आदी विचारवंतांची, समाजसुधारकांची चरित्रे.
  • आजपर्यंत समाजमनावर अतिप्रचंड प्रभावशाली ठरलेली परिवर्तन चळवळ वाचकांच्या भेटीस साहित्याच्या स्वरुपात!

साहित्यिक माहितीफलक (प्रदर्शनी) आणि भाषिक व साहित्यिक खेळ

जागेचा प्रकार: मंदिर
घराचे / घरमालकाचे नाव: श्रीराम मंदिर
संपर्क:

बालसाहित्य

जागेचा प्रकार: शाळा
घराचे / घरमालकाचे नाव: हिलरेंज हायस्कूल (जतीन भिलारे)
संपर्क: 9890317222 / 02168250021

दिवाळी अंक

जागेचा प्रकार: घर
घराचे / घरमालकाचे नाव: श्री. गणपत सहदेव भिलारे
संपर्क: 9403547797

नियतकालिके व साहित्यिक माहितीफलक (प्रदर्शनी)

जागेचा प्रकार: मंदिर
घराचे / घरमालकाचे नाव: श्री हनुमान मंदिर
संपर्क:

इतिहास

जागेचा प्रकार: घरासह लॉज
घराचे / घरमालकाचे नाव: साईव्हॅली पॅलेस, श्री. विजय सखाराम भिलारे
संपर्क: 9823927628

वर्तमानपत्रे व साप्ताहिके

जागेचा प्रकार: खाजगी कार्यालय
घराचे / घरमालकाचे नाव: श्री. विशाल भिलारे
संपर्क: 9890852508

छत्रपती शिवाजी महाराज, शिवकालीन इतिहास व गडकिल्ले

जागेचा प्रकार: घर
घराचे / घरमालकाचे नाव: मंगलतारा, श्री. प्रशांत भिलारे
संपर्क: 8421242207 / 9112007227

स्त्री साहित्य

जागेचा प्रकार: घरासह लॉज
घराचे / घरमालकाचे नाव: श्री. अनिल रामचंद्र भिलारे
संपर्क: 9637178941

बालसाहित्य

जागेचा प्रकार: शाळा
घराचे / घरमालकाचे नाव: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
संपर्क: