बोधचिन्ह

संत तुकाराम महाराजांचा शब्दांचे महत्त्व सांगणारा अभंग, प्रकल्पाचा मुख्य गाभा असलेले पुस्तक आणि स्थानिक ओळख असलेले स्ट्रॉबेरी हे फळ यांचा समन्वय साधत निर्मिती ग्राफिक्स् (कोल्हापूर व मुंबई) च्या कलाकारांनी व तंत्रज्ञांनी पुस्तकांच्या गावास साजेसे असे बोधचिन्ह निर्माण केले.

“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” हे प्रकल्पाचे बोधवाक्यच आहे. प्रकल्पात सहभागी झालेल्या प्रत्येक घराचीच नव्हे, तर संपूर्ण गावाचीच या प्रकल्पाबाबतची भावना या शब्दांमधून व्यक्त होते.

बोधचिन्हाचे सूक्ष्मतेने निरीक्षण केल्यास, स्ट्रॉबेरीच्या गाठी आणि देठ यांच्या ठिकाणीही पुस्तकाची रचना केल्याचे दिसते.

संत तुकाराम महाराज यांनी रचलेला मूळ अभंग
आम्हां घरीं धन शब्दांचींच रत्ने |
शब्दाचींच शस्त्रें यत्नें करु ||
शब्दचि आमुच्या जिवाचें जीवन |
शब्दें वांटू धनं जनलोकां ||
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव |
शब्देंचि गौरव पूजा करूं ||