प्रकल्पाची वैशिष्ट्ये

वैशिष्ट्ये

  • भिलार हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव.
  • मा. ना. श्री. विनोद तावडे, मराठी भाषा मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून साकार झालेला प्रकल्प.
  • महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागांतर्गत कार्यरत असलेल्या राज्य मराठी विकास संस्थेचा प्रकल्प.
  • महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध महाबळेश्वर आणि पाचगणी या थंड हवेच्या ठिकाणांजवळचे गाव.
  • राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेला आणि जगाच्या नकाशावर पोहोचलेला अभिनव प्रकल्प.
  • हा प्रकल्प म्हणजे, “शासनाचा पुढाकार आणि गावाचा सहभाग” याचं उत्कृष्ट उदाहरण.
  • पुस्तके ठेवण्यासाठीची जागा घरमालक, ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन ह्यांच्याकडून प्रकल्पाला विनामोबदला उपलब्ध.
  • भिलार हे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठीही प्रसिद्ध असलेले गाव.
  • भिलार धबधबा, घनदाट वनराई, पक्ष्यांचा किलबिलाट असे निसर्गरम्य गाव.
  • थंड व स्वच्छ हवा आणि नीरव शांतता यांचा अनुभव देणारं गाव.
  • ग्रामस्थांचा उत्साह, औदार्य आणि आदरातिथ्य यांचीही अनुभूती देणारं गाव.
  • १५000 पुस्तकांचा अद्भूत खजिना... वाचण्यासाठी विनामूल्य उपलब्ध.
  • गावातील राहती घरे, निवासाची सोय (लॉजिंग), लॉजेस, शाळा व मंदिरे अशा २५ सार्वजनिक ठिकाणी विविध साहित्यप्रकारांची पुस्तके.
  • कथा, कादंबरी, कविता, चरित्र-आत्मचरित्र अशा रूढ साहित्यप्रकारांसोबतच विज्ञान, क्रीडा, नियतकालिके, विविध कलांविषयक, परिवर्तन चळवळ, निसर्ग-पर्यटन-पर्यावरण, दिवाळी अंक, लोकसाहित्य, मराठी भाषा व संस्कृती आणि छत्रपती शिवाजी महाराज व शिवकालीन इतिहास अशा वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारांची विविध घरांत मेजवानी.
  • मराठी साहित्य क्षेत्रातील एकूण ५० सुप्रसिद्ध साहित्यिकांची संक्षिप्त माहिती देणारी प्रदर्शनी.
  • मनोरंजनाबरोबरच साहित्यिक ज्ञानात व माहितीत भर घालणारे वैविध्यपूर्ण भाषिक व साहित्यिक खेळ.
  • वाचन-लेखन कार्यशाळा, अभिवाचन, काव्यवाचन, पुस्तक प्रकाशन, नाट्यप्रवेश सादरीकरण अशा अनेक साहित्यिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होणार.
  • औपचारिक उद्घाटनापूर्वीच वाचकांच्या व पर्यटकांच्या पसंतीस पडलेला प्रकल्प.
  • प्रशासकीयदृष्ट्या भिलार हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील गाव

ठिकाणापासून भिलारचे अंतर (किमी)